वालीव्हरे आश्रमशाळेतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी
दोषींवर कठोर कारवाई करणार
- आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके
मुंबई, दि. १६ : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वालीव्हरे येथील आश्रमशाळेत १० वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य किसन कथोरे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीमध्ये
विधानसभा सदस्य संजय केळकर यांनी सहभाग घेतला होता.
आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके म्हणाले, या घटनेनंतर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. चौकशीत शिक्षण व देखरेखीच्या जबाबदारीत कसूर झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक व अधीक्षक यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. शाळेच्या व्यवस्थापनावर प्रशासक नेमून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री.वईके यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment