टायर पायरोलिसिस रिसायकलिंग कंपन्यांनी
कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १ : टायर पायरोलिसिस रिसायकलिंग प्रक्रियेविषयी राष्ट्रीय हरित लवादाने तयार केलेल्या कार्यप्रणालीचे पालन करणे सर्व टायर रिसायकलिंग कंपन्यांसाठी बंधनकारक असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.
सदस्य दौलत दरोडा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.
मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, टायर पायरोलिसिस प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी, राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक सुस्पष्ट कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार मागील तीन वर्षात पायरोलीसीस पद्धतीने स्क्रॅप टायरपासून पायरोलीसीस ऑईल व कार्बन ब्लॅक पावडर बनविणाऱ्या कारखान्यामध्ये सात अपघात झाल्यामुळे या अपघातांची सखोल चौकशी करुन सात फौजदारी खटले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वसई यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment