डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या
दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई
- मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १ : डहाणू तालुक्यातील सुकड आंबा शिरसून पाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी संबंधित उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांचे तत्काळ निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
सदस्य विनोद निकोले यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १.५ लाख रुपयांची मदत शासनामार्फत देण्यात आली आहे. तसेच या कामासाठी जबाबदार ठरलेल्या हरिश बोरवेल्स या कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment