पावसाळी अधिवेशनात सर्वसमान्यांच्या हिताचे निर्णय घेतले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसमान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. विरोधी पक्षाच्या प्रत्येक प्रश्न, लक्षवेधीवर उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. याशिवाय अधिवेशनात झोपडपट्टी पुनर्विकास, क्लस्टर योजना, परवडणाऱ्या घरांची निर्मिती, महिलांसाठी वसतीगृह, पोलिस व गिरणी कामगारांसाठी घरांची कामगिरी यावरही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. मुंबईच्या झोपडपट्टी विकासाला चालना देण्यासाठी शासकीय यंत्रणा व खासगी क्षेत्रात संयुक्त उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या कामकाजाशिवाय विविध बैठकांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील 150 दिवस कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला असून यामाध्यमातून प्रशासनास गती देण्याचे काम करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अर्धातास चर्चा व लक्षवेधी सूचनांवर सर्वाधिक चर्चा – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या अधिवेशनात 57 हजार 509 कोटींची पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. अनेक चांगली कामे या अधिवेशनात झाली आहे. यापूर्वी पेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात अर्धातास चर्चा व लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. रात्रभर तयारी करून अधिकाऱ्यांनी लक्षवेधी प्रश्नांची उत्तरं दिली. एकेका दिवशी 25-30 लक्षवेधी मांडल्या गेल्या, जे अभूतपूर्व होते.
विधीमंडळाच्या आवारात काल घडलेल्या घटनेवर तीनही मान्यवरांनी खेद व्यक्त करून अशी घटना यानंतर घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन : २०२५
विधेयकांची माहिती
दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके – १७
विधानसभेत प्रलंबित विधेयके – ००
विधान परिषदेत प्रलंबित विधेयके – ००
मागे घेण्यात आलेली विधेयके – ०१
दोन्ही सभागृहात मंजूर विधेयकेमहाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन : २०२५
विधेयकांची माहिती
दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके – १७
विधानसभेत प्रलंबित विधेयके – ००
विधान परिषदेत प्रलंबित विधेयके – ००
मागे घेण्यात आलेली विधेयके – ०१
दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके
No comments:
Post a Comment