अवैध मद्य विक्रीवर तातडीने कारवाई
- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. ९ - राज्यात अवैध मद्य विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.
सदस्य भाई जगताप यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव परिसरात अवैधरित्या मद्यविक्री होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
पुसेगाव येथील कारवाईबाबत माहिती देताना गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, पुसेगाव पोलीस स्थानक हद्दीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे वेळोवेळी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. मे २०२५ अखेर अवैध दारुबंदीच्या २२ गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली असून यामध्ये २१,१०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगाराच्या सात गुन्ह्यांमध्ये ४३,४२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment