Wednesday, 23 July 2025

मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 मंत्रालयात रक्तदान शिबिर८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

मुंबईदि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदसर जे. जे. महानगर रक्त केंद्र व हरिवंश राय बच्चन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात राज्य माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार रामभाऊ गुंडीलेफिरोज मासुकदारराज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरीतसेच प्रतिष्ठानचे संस्थापक निवृत्ती यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी  सर जे. जे. महानगर रक्त केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा आचार्यसर जे जे रुग्णालय व महाविद्यालयाच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीता डांगेतसेच प्रतिष्ठानचे हरीश रावल आदींनी सहभाग घेतला.

सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरास सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकप्रतिनिधीशासकीय व पोलीस अधिकारीकर्मचारीव नागरिकांनी भेट दिली. यावेळी रक्तदानाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

---

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi