Friday, 11 July 2025

मिठी नदी विकास प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी

 मिठी नदी विकास प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी

 विशेष तपास पथकाकडून चौकशी

- उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबईदि. १० : मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या पुनरुज्जीवन व प्रदूषण नियंत्रणाच्या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीत दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असूनअटक झालेल्यातील एकास सध्या जामीन मिळाला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) नोंदविता येऊ शकेल कायाबाबत विचार केला जाईलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानपरिषदेत सदस्य राजहंस सिंह यांनी या प्रकरणावर लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. चर्चेत सदस्य भाई जगतापॲड.अनिल परबप्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांनीही सहभाग घेतला.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले कीमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. यात २०१३ नंतर कोणत्याही नव्या कामांना मान्यता दिलेली नाही. प्राथमिक चौकशीत दोघांना अटक करण्यात आली असूनआणखी १४ व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने हा घोटाळा झाला असल्याचे दिसून येत आहे.

हा गैरव्यवहार २००५ पासून कालावधीतील असूनआत्तापर्यंत तीन-चार वर्षातील तपास झाला आहे. २००५ ते २०१९ या कालखंडातील व्यवहारांची तपासणी अद्याप बाकी आहे. यासाठी विशेष तपास पथकाला अधिक वेळ देण्याची आवश्यकता असल्याचेही श्री. सामंत यांनी नमूद केले.

मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलनि:सारण वाहिन्यामलजल प्रक्रिया केंद्र आदी कामे सुरू आहेत. आर्थिक गुन्हे विभागाच्या प्राथमिक अहवालानुसारया प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे आढळले असूनत्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या मार्गदर्शनाखाली तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असूनया प्रकरणाचा तपास सध्या सुरू असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi