भायखळा येथील हत्येच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करणार
- गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. १० : भायखळा येथे राजकीय वर्चस्व वादातून हत्याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संघटीत गुन्हेगारी टोळी असल्याचे निष्पन्न होत असल्याने, गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) कारवाई करण्यात आली आहे. सखोल तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येईल, असे गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य पंकज भुजबळ यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभाग घेतला होता
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास भायखळा पोलीस ठाणे यांनी केला असून त्यात ६ आरोपींना अटक केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी काही जणांचा गुन्हयात सहभाग असल्याचा व त्यांच्या राजकीय वर्चस्ववादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्याअनुषंगाने सखोल तपासात आतापर्यंत संशय व्यक्त करण्यात आलेल्या व्यक्तींचा खुनाच्या कटात कोणताही सहभाग दिसून आला नाही असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment