सागरी सुरक्षा
निर्मनुष्य बेटांवर ड्रोनद्वारे निगराणी ठेवली जात आहे असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी सागरी सुरक्षेसाठी केल्याऱ्या सागरी सुरक्षेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये २० नौका खरेदी करण्याची प्रक्रिया पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत सुरू आहे, याशिवाय ३२ खाजगी मच्छिमार ट्रॉलर्स भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील आम्ही मान्यता दिली आहे.
क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम राबविण्यामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. ‘एनसीआरबी’ च्या प्रगती रॅंकिंगमध्ये महाराष्ट्र आघाडीचे राज्य आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या २२ सेवा नागरिकांना सुलभ आणि पारदर्शकपणे देण्यासाठी सिटीझन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ही सेवा लोकप्रिय होत असून ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून ३१ मे पर्यंत ३ लाख ३९ हजार ६०९ ई तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment