Tuesday, 8 July 2025

दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भूते यांची मुलाखत

  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या

प्रमुख शुभांगी भूते यांची मुलाखत

 

मुंबईदि. ८माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात, 'हवामान अंदाज तंत्रज्ञान आणि प्रादेशिक हवामान केंद्राच्या कार्यपद्धतीया विषयावर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत गुरुवारदि. १०,जुलै शुक्रवारदि. ११शनिवारदि. १२ आणि सोमवारदि. १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर देखील ही मुलाखत ऐकता येईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

हवामानाच्या अचूक अंदाजामुळे शेतीपर्यटनआपत्ती व्यवस्थापन आणि इतर विविध क्षेत्रांना अमूल्य मदत होते. या माध्यमातून नागरिकांचे संरक्षण व आर्थिक व्यवस्थापन अधिक सक्षम बनते. प्रादेशिक हवामान विभाग भारतीय हवामान विभागांतर्गत कार्यरत असूनहवामान निरीक्षणडेटा संकलनअलर्ट सिस्टीमद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले कार्य करत आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीमती भूते यांनी या अंदाजामागील वैज्ञानिक प्रक्रियावापरण्यात येणारे तंत्रज्ञानउपग्रह व रडार यंत्रणा यासंदर्भातील माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi