Saturday, 19 July 2025

ऑनलाइन गेमिंगसाठी कायदा करण्याची केंद्राला विनंती

 ऑनलाइन गेमिंगसाठी कायदा करण्याची केंद्राला विनंती

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १८ : ऑनलाइन गेमिंग बंद करण्यासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही. ऑनलाइन लॉटरी व गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली आहेत्याबाबत पाठपुरावा करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले.

सदस्य कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेऑनलाइन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचे नियम  राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंग नियंत्रणासाठी सध्या कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नाही. ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रतिथयश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नयेअसे आवाहन त्यांनी यावेळी सभागृहाच्या माध्यमातून केले.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi