Saturday, 19 July 2025

कला व क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षणांचे सुनियोजित पद्धतीने आयोजन करणार

 कला व क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षणांचे

सुनियोजित पद्धतीने आयोजन करणार

- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुंबईदि. १८ : जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर कला व क्रीडा शिक्षकांचे यापुढील प्रशिक्षणांचे आयोजन सुनियोजित पद्धतीने सुसज्ज इमारतीतप्रशिक्षणार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा असलेल्या ठिकाणी करण्यात येणार आहे अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

 

विधानपरिषदेत सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी चर्चेमध्ये प्रविण दरेकर व अभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.

 

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणालेराज्यभरातील प्राथमिकमाध्यमिकउच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयांतील तसेच कला व क्रीडा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी २ ते १२ जून २०२५ या कालावधीत १० दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासंबंधित मूलभूत सुविधांबाबत तक्रारींची माहिती घेण्यात येईलअसेही डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.

           हे प्रशिक्षण सशुल्क होते. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याकडून २००० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. प्रशिक्षण शुल्कामध्ये वाचन साहित्यतज्ज्ञ व प्रशिक्षकांचा प्रवासनिवास व इतर अनुषंगिक खर्च समाविष्ट आहे. मात्रभोजन व चहापान यांचा समावेश सद्यस्थितीत नव्हता.

 

यापुढील प्रशिक्षणांमध्ये वाचन साहित्य इतर अनुषंगिक खर्चभोजन व चहापान यांचा समावेश करण्यात येईल असे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi