भंडारा येथील विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याप्रकरणी
तरतुदींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना
- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. १८ : भंडारा येथील जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याप्रकरणी परीक्षा घेण्यासाठी तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांची परीक्षा २३ एप्रिल, २०२५ रोजी घेण्यात आली आहे. अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
विधानपरिषदेत सदस्य डॉ. परिणय फुके यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, या विद्यालयातील इयत्ता ११वी ची विज्ञान शाखेची तुकडी स्वयंअर्थसहाय्यीत असून तुकडीमध्ये ६३ विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थ्यांनी शाळा शुल्क भरले नसल्याने ३६ विद्यार्थ्यांना पेपरला बसू न देता परत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये २१ मुले व १५ मुलींचा समावेश असून या ३६ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे.
0000
No comments:
Post a Comment