मुंबई शहरातील पदपथावरील आकांक्षा शौचालयांच्या
कामांची चौकशी करणार
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १७ : बृहन्मुंबई महानगरपालिका शहर भागामध्ये पदपथावरील आकांक्षा शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी सन 2023 -24 मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून बारा कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या संपूर्ण कामांची मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या स्तरावर चौकशी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य अमित साटम यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली होती.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, पदपथावरील प्रस्तावित शौचालयाच्या कामाची चौकशी करण्यात येईल. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाला स्थगिती देण्यात येईल आणि या संदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येईल.
मंत्री ॲड.आशिष शेलार, सदस्य अतुल भातखळकर, वरूण सरदेसाई यांनी या संदर्भात उपप्रश्न उपस्थित केले होते.
No comments:
Post a Comment