Tuesday, 29 July 2025

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

 विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते

अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

 

मुंबईदि. 29 : पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कामगार आयुक्तटाटा कंपनीचे अधिकारी यांना पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पीडित कुटुंबाला 35 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

विधानसभा उपाध्यक्ष यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत टाटा मोटर्सचे व्यवस्थापककामगार विभागाचे अधिकारीपोलीस अधिकारी व कामगार नेते आदी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले कीअपघातानंतर कामगारांच्या कुटुंबांची जबाबदारी कंपनीने घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व संबंधित अधिकारीपोलिस विभाग आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहकार्याने पीडित कुटुंबाला 35 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झालाहे समाधानकारक असल्याचे श्री. बनसोडे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला दिला


सा मिळाला असूनपुढील काळातही व्याजाच्या स्वरूपात त्यांना आधार मिळणार आहेअसेही उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी सांगितले.

मृत्यू झालेल्या पुष्पेद्रकुमार यांना कंत्राटाचे काम दिलेले होते. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मे.टाटा मोटर्स यांनी पीडित कुटुंबाला 30 लाख रुपये मुदत ठेव स्वरुपात आणि त्यावरील व्याजातून दर महिन्याला कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. तसेचखर्चासाठी 5 लाख रुपये पीडित कुटुंबाला देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi