Wednesday, 30 July 2025

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जुलै रोजी परिसंवाद · संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा

 जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जुलै रोजी परिसंवाद

·        संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा

 

मुंबई दि. २९ -  संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने मानवी तस्करी या समस्येबाबत चर्चा व्हावीजनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संवेदनशीलता ते संकल्प:  शोषणाविरोधात लढा या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे केले आहे. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेराज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मार्गदर्शन करणार आहेत.

जगभरातील अनेक देश मानवी तस्करी या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या गुन्हेगारी विरोधात लढा देत आहेत. भारतातही मानवी तस्करी हा चिंतेचा विषय आहे. मानवी तस्करीचे प्रकारतस्करी ओळखणेतस्करी रोखण्यासाठी संबंधित घटकांना प्रशिक्षणयंत्रणांतील समन्वयपीडितांना मदतन्यायलयीन सहाय्य आणि त्यांचे पुनर्वसन तसेच जागरूकता मोहिम आदी विषयांवर देशभरातील तज्ञ व्यक्ती या परिसंवादात विचार मांडणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परिसंवादात पोलिसरेल्वे पोलिस दलकायदेतज्ज्ञसरकारी वकीलमहिला व बाल संरक्षण अधिकारीपरिवहन क्षेत्रसमाजसेवी संस्थांचे प्रतिनिधीतांत्रिक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi