Wednesday, 30 July 2025

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर · १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण

 २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय

कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर

·         १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

 

मुंबईदि २९ : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक  यांना दिले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले  आहेत. दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृहएसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केली.

सन २०२३-२४ या वर्षासाठीचे हे पुरस्कार असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात चार आणि ग्रामीण विभागात तीन उत्कृष्ट ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनुसार जाहीर करण्यात आले आहे. शहरीभागासाठी रोख रक्कम अनुक्रमे  एक लाख ते २५ हजार रुपयेग्रामीण भागासाठी ७५ हजार ते २५ हजार अनुक्रमे आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.

डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार राज्यस्तरावर दोघांना पुरस्कार रक्कम ५०हजार आहेत.  विभागस्तरावर पाच जणांना जाहीर झाले आहेत. तर डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार हे विभागस्तरावर सहा जणांना जाहीर झाले आहे. या सर्व पुरस्कारासाठी रोख २५ हजार रुपयेसन्मानचिन्हप्रमाणपत्र असे स्वरूप आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग :

 सार्वजनिक वाचनालयशिवाजी चौककल्याण पश्चिमता.कल्याणजि.ठाणे

  सर्वात्मक वाचनालयबापू बंगला स्टॉपइंदिरानगरनाशिक

 ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयवाघापूरता.जि.यवतमाळ

 मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालयपंचवटीनाशिक

ग्रामीण विभाग

१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालयचोराखळीता. कळंबजि. धाराशिव

२)बलराम सार्वजनिक वाचनालयफुलउमरीता. मानोराजि. वाशिम

३) प्रगती सार्वजनिक वाचनालयसिल्ली (आंबाडी) जि. भंडारा

डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार

राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

१) श्री. धनंजय वसंतराव पवारअध्यक्षश्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालयहासाळापो. बुधोडाता. औसाजि. लातूर

 राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)

१) श्रीमती श्रध्दा अशोक आमडेकरग्रंथपालश्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुखतालुका संगमेश्वरजिल्हा-रत्नागिरी

विभागस्तरीय पुरस्कार

१) अमरावती: श्री. रामभाऊ पंढरी मुळेसचिवछत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालयमु. पो. हनुमान नगरअकोलाता.जि. अकोला.

२) छत्रपती संभाजीनगर:  श्री. खंडेराव साहेबराव सरनाईकअध्यक्षश्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयकेंद्रा बु.ता. सेनगावजि. हिंगोली.

३) नाशिक: श्री. राहुलकुमार मालजी महिरेअध्यक्षबौध्दवासी शांताई महिरे वाचनालयआखाडेमु.पो. आखाडेता. साक्रीजि.धुळे

 

४) पुणे: श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडेअध्यक्षज्ञानदा मोफत वाचनालयजरळीता. गडहिंग्लजजि. कोल्हापूर

५) मुंबई: श्री. सुभाष सीताराम कुळकर्णीअध्यक्षप्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशीनवी मुंबई

डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार

१) अमरावती: श्री. अनंत श्रीराम सातवग्रंथपालसरस्वती वाचनालयपातुर्डा बु.ता.संग्रामपूरजि.बुलडाणा

२) छत्रपती संभाजीनगर: श्री. सूर्यकांत कमलाकर जाधवग्रंथपालविवेकानंद वाचनालयआलमलाता. औसाजि. लातूर

३)नागपुर: श्री. खेमचंद अंताराम डोंगरवारग्रंथपाल,श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालयनवेगाव / बांधता.अर्जुनी मोरगावजि. गोंदिया

४)नाशिक: श्री. चिंतामण संतोष उगलमुगलेग्रंथपालओंकार नगर सार्वजनिक वाचनालयओंकारनगरपेठ रोडता.जि. नाशिक

५)पुणे: श्रीमती रुपाली यशवंत मुळेग्रंथपालश्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयसातारा.

६)मुंबई: श्री. संजय काशिनाथ शिंदेग्रंथपालनगर वाचन मंदिरमालवणजि. सिंधुदुर्ग

राज्यातील जनतेचे सामाजिकशैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी  शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावेयासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावाया ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi