Saturday, 19 July 2025

सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करून मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार

 सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करून

मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती

 

•          वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत

•          महायुती सरकारच्या काळात मुंबईचा मेकओव्हर

•          गिरणी कामगारांच्या घरांसाठी हौसिंग स्टॉक वाढवणार

•          धारावीचा पुनर्विकास स्मार्ट मुंबईच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल

•          परवडणारी ३५ लाख घरे बांधणार

मुंबईदि. १७: मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करतोय असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेमुंबईचा मेकओव्हर खऱ्या अर्थाने आम्ही करतोय. मुंबईसाठी सर्वाधिक काम महायुती सरकारच्या काळात झालंय. ही कामं मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईचा सर्वात मोठा विकास आम्ही करतोय. मुंबईचा सर्वार्थाने कायापालट केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi