ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील
नागरिकांसाठी वरदान ठरणार
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये
महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी
मुंबई, दि. २९ : ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
No comments:
Post a Comment