Thursday, 17 July 2025

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी

 एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे,

ही लोकशाहीची मोठी देणगी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १६ :"एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतोही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी आपल्या कर्तुत्वाने मोठा होऊ शकतोही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि लोकशाहीने सामान्यांना दिलेली मोठी देणगी आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी पूर्ण होत असूनत्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सभापती प्रा. राम शिंदेउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविविध विभागाचे मंत्री यांच्यासह गटनेते व सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेयोगशास्त्रात एम.ए.पत्रकारितेचा अनुभव आणि मराठवाडा विभागात बारावीमध्ये गुणवत्तायादीत सहावे स्थान मिळवणाऱ्या युवकाने जनतेच्या प्रश्नांची समजठाम भूमिकाविविध संस्थांबरोबर सामाजिकक्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्ययामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आंदोलने उभारून ती यशस्वी केली.

 यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आदींनी विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi