Thursday, 17 July 2025

मिठी नदी गाळ भ्रष्टाचार प्रकरणाची सन २००६ पासून चौकशी

 मिठी नदी गाळ भ्रष्टाचार प्रकरणाची सन २००६ पासून चौकशी

- मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 17 : मिठी नदीतील गाळ काढण्यात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी तीन वर्षात 65 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला असूनसंबंधित प्रकरणाची चौकशी 2006 पासून सुरू करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

            सदस्य प्रसाद लाड यांनी मिठी नदी गाळ उपसा बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री ॲड अनिल परबप्रवीण दरेकरभाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.

एसआयटीने 2012 ते 2021 या कालावधीत तीन लाखाहून अधिक फोटो तपासले असल्याचे सांगून मंत्री सामंत म्हणाले कीया प्रकरणी सध्या काही आरोपी अटकेत असूनअटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील दाखल झाले आहेत.

चौकशीत अनेक ठिकाणी काम न झाल्याचे किंवा चुकीचे काम झाल्याचे निदर्शनास आले असूनयामध्ये सहभागी ठेकेदारांची यादी सरकारकडे आहे. संपूर्ण प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तींचे संरक्षण न करतादोषींवर कठोर कारवाई केली जाईल. काढण्यात आलेला गाळ कचराभूमीत न टाकता खासगी जागेत टाकण्यास मान्यता दिल्याने हा घोटाळा झाल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi