आवास योजनेतील घरांसाठी 'महाआवास' ॲप विकसित
- मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 10 : राज्यातील नागरिकांना आवास योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या घरांची माहिती एका ठिकाणी, सुलभतेने मिळावी यासाठी नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘महाआवास’ हे विशेष ॲप विकसित केले जात असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य प्रवीण दटके यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, या ॲपच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना आणि गृहनिर्माण योजनेंतर्गत राज्यभरात ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत, त्या सर्वांची माहिती नागरिकांना एकत्रित स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना स्वतःच्या पसंतीनुसार घर निवडून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तीन महिन्याच्या कालावधीत हे ॲप विकसित होऊन या सगळ्यात सुसूत्रता येईल. या ॲपद्वारे पारदर्शकतेसह घरांची लॉटरी प्रणाली कार्यान्वित केली जाईल. दर आठवड्याला नोंदणीकृत लाभार्थ्यांची लॉटरी म्हाडामार्फत काढून घरांचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment