शालार्थ ‘आयडी’ प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांची
‘एसआयटी’ मार्फत चौकशी
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. १० : राज्यातील शालार्थ ‘आयडी’ प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) स्थापन करून सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
सदस्य संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य रणधीर सावरकर, वरुण सरदेसाई, किशोर आप्पा पाटील, गोपीचंद पडळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयएएस, आयपीएस अधिकारी तसेच शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेले विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. संबधित शिक्षण उपसंचालक यांना निलंबित करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment