Sunday, 20 July 2025

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या

 धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. १६ : धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार  नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी तांत्रिकआर्थिक व लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार्यता तपासावी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हब उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवनमंत्री गणेश नाईकआमदार अनुप अग्रवालअपर मुख्य सचिव असिम गुप्तानगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराजऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्लामहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासूधुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (दूरदृश्य प्रणालीद्वारे)महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीधुळे येथे उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच देवपूरवलवाडी व सखल भागात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधावा. धुळे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन डीआय पाईपलाईन टाकणेऔद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणेभुयारी मलनिस्सारण योजनेसाठी निधी मंजूर करणे याबाबतही सूचना दिल्या.

तसेचधुळे शहरास दरवर्षी पाणी वितरण व पथदिव्यांसाठी ३२ ते ३३ कोटी रुपयांचा वीज खर्च होत असूनहा भार कमी करण्यासाठी योग्य जागेवर सौर प्रकल्प उभारावेत. शहराचा विस्तार ४६.४६ चौ.कि.मी. वरून १०१.०८ चौ.कि.मी. पर्यंत झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या हद्दीतील मुलभूत सोयींसाठी नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करावाअशीही सूचना त्यांनी दिल्या.

याशिवायचाळीसगाव रोडलगत म्हाडाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारणे आणि मौजे धुळे येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावीअसे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi