Tuesday, 17 June 2025

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे

 विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा तालुक्यातील

 कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत

 

सातारा दि. 16 : शाळा संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कलाक्रीडासाहित्य, संस्कृती यांसह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या शाळेचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. यावेळी आमदार महेश शिंदेआमदार मनोज घोरपडेजिल्हाधिकारी संतोष पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनअपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राज्यशासन राबवित आहे. या शाळांमधील विद्यार्थी उच्च पदावर काम करित आहेत. माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जी. अब्दुल कलामराष्ट्रती द्रौपदी मुर्मूप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानींही शासकीय  शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे. शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘माझी शाळा आदर्श शाळा’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागात अमुलाग्र बदल केले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणेआनंददायी शिक्षणमुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकासंघर्ष करा व संघटीत व्हा असे सांगतले होते. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावेअसे आवानही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi