केमसेफ केमिकल कंपनीतील कंत्राटी कामगारांना
टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात
- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
मुंबई, दि. १९ :- केमसेफ केमिकल कंपनीमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने पुन्हा कामावर घ्यावे, कंपनीच्या नियोजनानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने नेमणुका द्याव्यात, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कक्षात बैठक झाली. यावेळी कामगार उपआयुक्त अभय कुमार गीते, कामगार विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय जनरल कामगार उत्कर्ष संघटनेचे इंदर शेंडगे, गजानन गिरी, कंपनीचे संचालक आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
तळोजा एमआयडीसी मधील केमसेफ कंपनीचे कामावरून काढून टाकलेले अनेक कामगार २० वर्ष अथवा दीर्घ काळापासून कंत्राटी स्वरूपात काम करीत होते. यांना काम न देता नवीन कामगार कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत. यापूर्वी काम करणाऱ्या ६५ कामगारांना कंत्राटी पद्धतीने टप्प्याटप्प्याने कामावर नेमावे, असे निर्देश उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी यावेळी दिले
No comments:
Post a Comment