Wednesday, 4 June 2025

अमृत ग्राम महा आवास अभियान,पुरस्कार प्राप्त विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींची यादी

अमृत ग्राम महा आवास अभियान-महाराष्ट्राची गौरवगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पुरस्कार विजेत्यांची यशोगाथा देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या विभागजिल्हातालुका आणि ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रतिनिधीक स्वरूपात महा आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या चावीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० लाख घरांचे उद्दीष्ट पत्र सुपूर्द करण्यात आले.

 

पुरस्कार प्राप्त विभागजिल्हातालुका आणि ग्रामपंचायतींची यादी

 

अमृत महाआवास अभियान २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे विभागजिल्हेतालुकेग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

 कोकण विभाग प्रथमनाशिक विभाग द्वितीय तर नागपूर विभाग तृतीय

 

राज्य पुरस्कृत आवास योजना

नाशिक विभाग प्रथमकोंकण विभाग द्वितीय तर  पुणे विभाग तृतीय.

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

अहिल्यानगर जिल्हा प्रथमसिंधुदुर्ग जिल्हा द्वितीयगोंदिया जिल्हा तृतीय.

 

 राज्य पुरस्कृत आवास योजना

 अहिल्यानगर जिल्हा प्रथमसिंधुदुर्ग द्वितीयसातारा जिल्हा तृतीय.

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

 अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका प्रथमसिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड द्वितीयसातारा जिल्ह्यातील  जवळी तालुका तृतीय.

 

राज्य पुरस्कृत आवास योजना

 अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुका प्रथम,  गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी  द्वितीयअमरावती जिल्ह्यातील  अंजनगाव सुर्जी  तालुका तृतीय.

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

सातारा जिल्ह्यातील येळगाव ता.कराड  ग्रामपंचायत प्रथमसातारा जिल्ह्यातील भुडकेवडी ता.पाटण द्वितीय तर वाशीम जिल्ह्यातील चोंढी ता.मानोरा तृतीय.

 

राज्य पुरस्कृत आवास योजना

सातारा जिल्ह्यातील बोंद्रे ग्रामपंचायत ता. पाटण प्रथमवाशीम जिल्ह्यातील कारखेडा ता. मानोरा द्वितीयरत्नागिरी जिल्ह्यातील कुळवंडी ता.खेड ग्रामपंचायत तृतीय.

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीसाठी जळगाव जिल्ह्यातील हनुमंत खेडे ग्रामपंचायत ता.धरणगाव  प्रथम,  भंडारा जिल्ह्यातील भोसा (टाकळी) ता.मोहाडी  द्वितीय तर  वाशीम जिल्ह्यातील मोहगव्हान ग्रामपंचायत ता. मानोरा तृतीय.

 

राज्य पुरस्कृत आवास योजना

सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीसाठी नाशिक जिल्ह्यातील अंतापूर ग्रामपंचायत ता. बागलाण  प्रथमपरभणी जिल्ह्यातील डोंगरजवळा ग्रामपंचायत ता.गंगाखेड द्वितीयपुणे जिल्ह्यातील शिंद ग्रामपंचायत ता.भोर तृतीय.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi