Sunday, 22 June 2025

तुळजाभवानी मंदिर देवस्थान येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करावी

 तुळजाभवानी मंदिर देवस्थान येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना

पुन्हा कामावर घेण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करावी

- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबईदि. 4 : कोविड कालावधीत तुळजाभवानी मंदिर देवस्थान येथील कार्यरत 32 कर्मचाऱ्यांना नियुक्त कंत्राटदार कंपनीने काढले असल्याने त्यांना पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात विहित नियमांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ परिषद कक्षात बैठक झाली. यावेळी कामगार आयुक्त डॉ. एच. तुम्मोडअपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघकामगार विभागाचे उपसचिव स्वप्निल कापडणीसश्रमिक कामगार संघटनेचे यशवंत भाऊ भोसलेकामगार अधिकारी मंगेश झोलेव्यवस्थापक (प्रशासन ) अरविंद बोळंगे यासह कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तुळजापूर (जि. धाराशिव) येथील तुळजाभवानी मंदिर संस्थान कामगार नियुक्तीसाठी कंत्राटदार नेमले आहेत. बरेचसे कामगार दीर्घ काळापासून कंत्राटी स्वरूपात देवस्थानसाठी काम करीत होते. यापूर्वी अन्य कामगार पुरवठा कंत्राटदार कंपन्यांनीही काम केले आहे. कामगार पुरवठा कंत्राटदाराने कोरोना कालावधीत काढून टाकलेल्या या 32 कामगारांना कंत्राटी पद्धतीने तत्काळ कामावर घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi