Sunday, 29 June 2025

कोकण किनारपट्टीला 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

 कोकण किनारपट्टीला 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा

पुणे घाटसातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

 

            मुंबईदि.28: भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर राज्यात पुढील 24 तासात पुणे घाटसातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

            राज्यात मागील 24 तासांमध्ये (28 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 मिमी पाऊस झाला आहे. तर पालघर  जिल्ह्यात 16.1,  रत्नागिरी जिल्ह्यात 15.2 मिमीकोल्हापूर 15.2, आणि रायगड जिल्ह्यात 11.9 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 28 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  9.9, रायगड 11.9, रत्नागिरी 15.2,  सिंधुदुर्ग 19, पालघर 16.1, नाशिक 4.6, धुळे 9.4, नंदुरबार 1.6, जळगाव 1.9, अहिल्यानगर 0.4, पुणे 5.5, सोलापूर ०.१सातारा ७.१,  सांगली ३कोल्हापूर १५.२छत्रपती संभाजीनगर ०.३जालना ०.१बीड १,धाराशिव ०.१नांदेड २.१परभणी ०.६हिंगोली ०.४बुलढाणा ०.१अकोला ०.४वाशिम ०.२अमरावती ०.३यवतमाळ ३.४वर्धा १.६नागपूर ८.२बुलढाणा १६गोंदिया २२चंद्रपूर ४.४ आणि गडचिरोली जिल्ह्यात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील फये (ता.भुदरगड) गावातील डोंगर उतारावर जमिनीस भेग पडली असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर गारगोटी - पाटगाव रस्ता प्रजिमा 52 किमी 5/400 चोपडेवाडी गावाजवळ डोंगरास मोठमोठ्या भेगा पडल्याचे आढळले आहे. सदर ठिकाण भूस्खलन प्रवण असूनसंततधार पाऊस पडत असल्याने भूस्खलनाची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षा उपाय म्हणून प्रजिमा 52 रस्ता या ठिकाणी वाहतुकीस बंद करून वाहतूक पर्यायी मार्गे गारगोटी आकुर्डे करडवाडी कडगाव ममदापूर राज्यमार्ग क्रमांक 179 मार्गे वळवण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात विज पडून एक प्राणी मृत्यूनागपूर जिल्ह्यात रस्ते अपघातात नऊ प्राण्यांचा मृत्यू व 16 प्राणी जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन व्यक्तींचा मृत्यूयवतमाळ जिल्ह्यात पाण्यात पोहताना बुडून एक व्यक्तीचा मृत्यू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi