वृत्त क्र. २१३३
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राजशिष्टाचारात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी
-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश
मुबई दि.२१ : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देश-विदेशातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यांच्या राजशिष्टाचार विषयक बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची खबरदारी राजशिष्टाचार विभागाने घ्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचाराबाबत झालेल्या त्रुटी प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाला दिले. राजशिष्टाचार विभागात आवश्यकतेनुसार प्रशिक्षण, प्रबोधन आणि कार्यप्रणालीचे निर्धारण करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार विषयक बाबी मध्ये त्रुटी राहिल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राजशिष्टाचार ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य असून महाराष्ट्राचे अवलोकन देश पातळीवर होत असते, त्यामुळे भविष्यात अशी बाब घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.
<
No comments:
Post a Comment