Saturday, 17 May 2025

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून खुंदलापूरसह परिसरातील गावे वगळण्याबाबत प्रस्ताव सादर करावा

 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून खुंदलापूरसह परिसरातील गावे

वगळण्याबाबत प्रस्ताव सादर करावा

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. १४ : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील खुंदलापूर येथील जमिनीवरील फेरफार क्रमांक ४६५ वरील भूसंपादनाचे शेरे कमी करण्याबाबत वन विभागाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून ही गावे वगळण्याबाबत प्रस्ताव सादर करावाअसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 

 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षामध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील खुंदलापूर येथील जमिनीवरील फेरफार क्रमांक ४६५ वरील भूसंपादनाचे शेरे कमी करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होतीया वेळी मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. बैठकीस शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुखमहसूल विभागाचे अवर सचिव (भूसंपादन) डॉ.वसंत मानेउपसचिव नितिन खेडेकरकोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक श्री.रामानुजम उपस्थित होते. तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीस सहभागी झाले होते.

 

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची २४ व्या बैठकीत चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जनाईवाडी येथील गावकऱ्यांच्या सात-बारा वरील वनविभागाचे संपादन शेरे कमी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वन विभागाकडून आलेल्या प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव प्रकल्प यांच्याकडे पाठवण्यात येईल.

 

खुंदलापूरसह जनाईवाडीधनगरवाडी गावातील भूसंपादनाचे शेरे कमी झाल्यास या गावातील नागरिकाना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. या गावातील भूसंपादनाचे शेरे 1997 पासून आहेतते वगळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावाअसे निर्देश मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi