Thursday, 1 May 2025

मुंबईत साकारणार आयआयसीटी - माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 मुंबईत साकारणार आयआयसीटी - माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असूनत्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगलॲपलमायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.

अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार वेव्हज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणीश्रेया घोषालमांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तरवेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलालहेमामालिनीकार्तिक आर्यनएस.एस.राजामौलीरजनीकांतअनिल कपूरभूमी पेडणेकररणबीर कपूरआमिर खानरिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानीअडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गुरुदत्तश्रीमती पी.भानुमतीराज खोसलाऋत्विक घटकसलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi