Thursday, 8 May 2025

खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी पटकावले स्वर्णपदक

 खेलो इंडिया यूथ गेम्स 2025

महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी पटकावले स्वर्णपदक

 

नवी दिल्ली 7 : महाराष्ट्राच्या युवा नेमबाजांनी खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये आपल्या अचूक नेमबाजीने स्वर्णपदकांवर नाव कोरले. बिहार येथे आयोजित शूटिंग स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेदांत नितिन याने 50 मीटर थ्री पोजीशन्स राइफल (पुरुष युवा वर्ग) मध्ये 452.5 गुणांसह स्वर्णपदक पटकावले. त्याने हरियाणाच्या रोहित कन्यन (451.9) आणि पंजाबच्या अमितोज सिंह (440.1) यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

 

दुसरीकडेनवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंज येथे दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या 17 वर्षीय प्राची गायकवाड हिने 50 मीटर राइफल थ्री पोजीशन (युवा महिला वर्ग) मध्ये 458.4 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. प्राचीने स्थिरता आणि आत्मविश्वास दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. मुंबईत अरुण वारेसीबिबास्वान गांगुली आणि शुभम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्राचीला तिचे वडील शशिकांत गायकवाड यांच्या प्रोत्साहनामुळे नेमबाजीची आवड निर्माण झाली.

000000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi