Thursday, 17 April 2025

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात कृषी विद्यावेत्ता आणि मृदा विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र' कार्यक्रमात कृषी विद्यावेत्ता आणि


 मृदा विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर यांची मुलाखत


 


मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प-२ ची अंमलबजावणी' या विषयावर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता आणि मृदा विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.


‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुचेता गरूडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR,


यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,


हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी शेतकऱ्यांना जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास साहाय्य करणे या उद्देशाने राज्यात 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' राबविण्यात येत आहे. राज्यात 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प-२' राबविण्यात येत असून सर्व दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना पाणी आणि हवेच्या परिस्थितीनुसार शेती करणे तसेच शेतविषयक नवीन संशोधनाचा उन्नत शेतीसाठी उपयोग करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, शेतीतील कर्ब उत्सर्जन कमी करणे आणि पौष्टिक तृणधान्य उत्पादनावर भर देणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे. राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी याविषयी या प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता तथा मृदा विज्ञान तज्ज्ञ श्री. कोळेकर यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi