चापेकर बंधूचे स्मारक म्हणजे गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र
चापेकर स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश असणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. यामध्ये क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्या त्याग आणि बलिदानाबद्दल तसेच स्मारकाबद्दल माहिती होती. शुभेच्छा संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, ‘क्रांतीवीर चापेकर बंधूंचा इतिहास हा आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी अध्यायांपैकी एक आहे. त्यांनी दाखवलेली राष्ट्रभक्ती, अपार साहस आणि बलिदान यामुळे देशप्रेमाला नव्या अर्थाने समृद्धी दिली. त्यांच्या स्मृतीस समर्पित हे राष्ट्रीय संग्रहालय केवळ एक स्मारक नाही, तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र आहे. हा उपक्रम आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रेरणा देतो आणि ‘विकसित भारत’ या आपल्या सामूहिक संकल्पाची आठवण सतत जागवतो.’
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना चापेकर स्मारकाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा जोशी यांनी केले तर आभार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रांतीवीर चापेकर वाडा येथील स्मारकास भेट
मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर वाडा येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकास भेट देऊन पाहणी केली. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी यावेळी स्मारकाविषयी माहिती दिली. श्री. फडणवीस यांच्या हस्ते क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर समरसता गुरुकुलम संस्थेसही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली गुरुकुलम संस्थेत सुरु असलेल्या विविध उपक्रमाविषयी व गुरुकुलमच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
No comments:
Post a Comment