कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेत फेरजल नियोजन अहवाल प्राप्तीनंतर
सर्व्हेक्षण मान्यता, निधी उपलब्ध करून देणार
- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. २० :- नियोजित कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेमध्ये रिटेवाडी व केल्तूर या उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. कुकडी प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेच्या सविस्तर सर्व्हेक्षणास मान्यता व आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
कुकडी प्रकल्पतीला लाभक्षेत्रास प्रकल्प नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून देण्यात असणाऱ्या अडचणी तसेच प्रकल्पाचे फेर जलनियोजन करून उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र शासनाच्या WAPCOS त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
करमाळा ( जि. सोलापूर) तालुक्यातील लाभक्षेत्र हे कुकडी डावा कालवा की. मी. २२३ ते २४९ अंतिम भागात असल्याने तालुक्यातील लाभक्षेत्रात पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही मात्र उजनीचे फेर पाणी वाटपानंतर या ठिकाणी पाणी उपलब्ध होईल,असे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
सदस्य नारायण पाटील यांनी करमाळा (जि.सोलापूर) तालुक्यात कुकडी प्रकल्पातून. पाणी मिळावे यासाठी लक्षवेधी उपस्थित केली होती.
No comments:
Post a Comment