Wednesday, 9 April 2025

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवसाचे आयोजन

 प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व नवकार महामंत्र दिवसाचे आयोजन’;

विश्वकल्याणासाठी नवसुत्री अंगीकारण्याचे प्रधानमंत्र्यांचे आवाहन

मुंबई येथे राज्यपालांच्या उपस्थितीत विश्व नवकार महामंत्र दिन संपन्न

मुंबई, दि. 9 : ‘विश्व नवकार महामंत्र’ दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अनेक देशात आयोजित या कार्यक्रमाला प्रधानमंत्री यांनी यावेळी संबोधित केले.

तरमुंबई येथे 'विश्व नवकार महामंत्र दिनमहाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएससीआय डोम वरळीमुंबई येथे सामूहिक मंत्रजपाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

आपल्या भाषणातून प्रधानमंत्री यांनी देशवासियांना नऊ संकल्प करण्याचे आवाहन केले. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवाआईच्या नावाने एक वृक्ष लावास्वच्छता पाळास्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करादेशातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यावीसेंद्रिय शेतीला चालना द्यावीनिरामय जीवनशैली अंगीकारावीश्रीअन्नाचा अधिक वापर करावायोग आणि क्रीडा यांना जीवनात स्थान द्यावे तसेच गोर-गरिबांना मदत करावी, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

मुंबईत आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी नवकार महामंत्र हा केवळ शब्द - अक्षरांचा समूह नसून तो अरिहंतसिद्धआचार्यउपाध्याय आणि सर्व साधू आदी ज्ञानी आत्म्यांचा सन्मान करणारा प्रभावी मंत्र असल्याचे सांगितले.

नवकार महामंत्र दिनानिमित्त प्रतिक्रियेपेक्षा चिंतनालामतभेदापेक्षा एकतेला आणि संघर्षापेक्षा शांततेला महत्व देण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

मुंबईतील कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढागच्छाधीपती नित्यानंद सुरीआचार्य के. सी. महाराजआचार्य नय पद्मसागरजी महाराजमुनी विनम्र सागरजीआचार्य डॉ. लोकेश मुनीअखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत राहुल बोधी महाथेरोजैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) चे पदाधिकारीजैन समाजाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.  

विश्व नवकार महामंत्र दिनाचे आयोजन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन 'जिटोया संस्थेतर्फे करण्यात आले होते.

**

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi