Sunday, 27 April 2025

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती; 29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणारhttps://mpsc.gov.in या संकेतस्थळावर

 पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती;

29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार

-         राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

 

मुंबईदि.26 : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना 29 एप्रिल 2025 पासून 19 मे 2025 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आली आहे.

 

राज्य शासनाच्या कृषिपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारीमहाराष्ट्र पशुसंवर्धन सेवागट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचा तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi