महावितरणच्या वसई मंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करणार
- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डेकर
मुंबई,दि. १७ महावितरणच्या (स.व सु.) वसई मंडळ अंतर्गत विरार विभागीय कार्यालयात बाह्यस्रोत कर्मचारी पुरवणे करिता मे.जी.ए. डिजिटल वैन वर्ड प्रा.लि. दिल्ली या कंपनीला 30 मार्च 2021 रोजी कंत्राट देण्यात आले होते या कंपनीने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही सुरू आहे.असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांनी विधानसभेत सांगितले. यासंदर्भात विधान सभा सदस्य प्रकाश सोळुंके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
महावितरणच्या मुख्य विधी सल्लागारांच्या शिफारसीनुसार, कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महावितरणच्या मानव संसाधन संचालकांसमोर सुनावणी झाली.काळ्या यादीत समावेश केला असून पुढील कंत्राट देण्यास बंदी घातली आहे. यांचा संपुर्ण अहवाल आल्यानंतर कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची करवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यामध्ये सदस्य कैलास पाटील सहभाग घेतला.
000
No comments:
Post a Comment