Thursday, 6 March 2025

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवांना जातवैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय लवकरच

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवांना


जातवैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय लवकरच


- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके


 सिंधुदुर्गातील आदिवासी ठाकर समाजाला जात वैधता प्रमाणपत्र


देण्याबाबत निर्णय घेण्याची मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची मागणी


 


मुंबई,दि. 5 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठक घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेवू, असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितले.


लोहगड निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे,आमदार चित्रा वाघ,आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे,सिंधुदुर्गचे ठाकर आदिवासी समाजाचे अध्यक्ष शशांक अटक,पदमश्री परशुराम गंगावणे,दिलीप म्हस्के यावेळी उपस्थित होते.


आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले की,शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विभागाने कार्यवाही करावी. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होवू नये. तज्‍ज्ञ समितीकडून सूचना घेवून याबाबत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्गातील ठाकर समाजातील समाजबांधवाना आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जात पडताळणी समितीकडे समाजबांधवानी प्रस्ताव दिल्यानंतर जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव प्रलंबित राहू नयेत. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागामध्येही रक्तनाते संबधामध्ये जातवैधता प्रमाणपत्र देण्यात यावीत. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेवून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi