महिलांचा प्रशासकीय सहभाग वाढविण्यासाठी विशेष ग्रामसभा
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच महिलांच्या शिक्षणातून त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. ही योजना यशस्वीपणे राबविण्यात महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरले आहे, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचा प्रशासकीय सहभाग वाढविण्यासाठी महिला दिनानिमित्त आज राज्यभर विषेश ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून, यापुढेही त्याचे आयोजन करण्यात येईल. उच्च शिक्षणात मुलींची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने विभाग काम करीत असून, शिक्षण क्षेत्रात मुलींची संख्या वाढविण्यात राज्य आघाडीवर असेल असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. आरोग्य, उद्योग, आर्थिक , सामाजिक क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment