अज्ज आखाँ वारिस शाह नूं, कितों कबरां विच्चों बोल'
स्त्रीशक्तीची क्षितीजे रुंदावणारा ‘चौराहा’
· एनसीपीए येथे रंगली बहुभाषिक काव्यसंध्या
· मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांच्या व्य वाचनाने रसिक तृप्त
मुंबई, दि. ७ : 'अज्ज आखाँ वारिस शाह नूं, कितों कबरां विच्चों बोल' या कवयित्री अमृता प्रीतम यांची ही कविता 1947 मध्ये झालेल्या फाळणीची प्रतिकात्मक रचना मानली जाते. फाळणीसारख्या हिंसाचाराचे बळी ठरलेल्या लोकांचा आवाज ही कविता (नज़्म) बनली, इतिहासाच्या एका महत्त्वाच्या क्षणी लिहिली गेली आणि स्वतःच इतिहासाचा एक भाग बनली. अशा अत्यंत लोकप्रिय कवितेने ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्ये’ ची सुरुवात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केली.
नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्रीशक्तीची क्षितीजे रुंदावणारा ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्या’ हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी कविता सादर केल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी आपले अनुभव, विचार आणि संवेदना व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलांचे अनुभव शब्दांत गुंफताना समाजातील वास्तव, स्त्रीशक्तीचा उलगडा आणि पुढील वाटचाल यावर प्रकाश टाकण्यात आला. या काव्यवाचनाने श्रोत्यांना एक वेगळी आत्मनुभूती दिली.
मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी सागरी किनारी एनसीपीए येथे अत्यंत रम्य वातावरणात हा कार्यक्रम होत आहे आणि कार्यक्रमात कविता सादर करण्यासाठी आपल्याला बोलावलं याबद्दल आभार मानले.
No comments:
Post a Comment