शेतकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी
कृषी उत्पन्न बाजार समितीने काम करावे
-कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासोबतच त्यांच्या शेतमालाला संरक्षण देण्याकरिता विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीने करावे, असे कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री केल्यानंतर शाश्वती वाटली पाहिजे. शेतकरी विश्वासाने माल विक्री करतात ते विक्री व्यवस्थेवर अवलंबून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. व्यापाऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करणे, त्यांच्याकडून आवश्यकतेनुसार अनामत रक्कम घेणे, खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती, कर्जफेडीची क्षमता आदीबाबत पणन विभागाने अभ्यास करावा.
शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेती करण्यावर भर दिला पाहिजे. कृषी क्षेत्रात विविध उपक्रमशील प्रयोग करण्यात येत असून त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने काम केले पाहिजे. शेतकरी चांगल्या प्रतीच्या शेतमालाचे उत्पादन करीत असतात, त्यांची जनजागृती केली पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात शेतकरी विक्री केंद्रे उभारणी केले पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर्शनी भागात मोठ्या आकाराचा एलईडी शेतमालाचे भाव, कृषी विषयक योजनांची माहिती, पर्जन्यमान, हवामान अंदाज आदींबाबत माहिती प्रकाशित करण्यात यावी.
राज्यात विविध ठिकाणी कृषी विभागाच्या जागेबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. शेतकरी प्रगतशील असून त्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासोबतच त्यांच्या मनातील अस्थिरता कमी करण्याकरिता कृषी व पणन विभागाच्या समन्वयाने येत्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येईल, असेही ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक संजय कदम म्हणाले, राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. असेही श्री. कदम म्हणाले.
पणन मंत्री रावल यांच्या हस्ते 20 वर्षापासून अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या सभापतींचा सन्मान करण्यात आले. यावेळी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल आणि कामकाजाबाबत चित्रफीत दाखविण्यात आली.
No comments:
Post a Comment