Wednesday, 5 February 2025

बुडीत बंधारा बांधकामामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल

 महाबळेश्वरजावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी

मंत्रिमंडळाची विशेष बाब म्हणून मान्यता

बुडीत बंधारा बांधकामामुळे  पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल

-         मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

मुंबई दि. 4 : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामास  विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे  या भागात पाण्याचे  दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना व शेतकऱ्यांना याचा लाभ होऊन पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेलअसा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील म्हणालेकोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येत आहेत.   जलाशयाची पाणी पातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

            मृद व जलसंधारण विभागामार्फत  कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्यात येणार आहेत.  या बंधाऱ्यांमुळे आवश्यक पाणी साठा होऊन  या भागात पिण्यास  व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. या कामास  मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मान्यता दिल्याने या भागातील नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल,असेही मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले.

२५ बंधारा बांधकामाच्या कामास १७० कोटीची तरतूद

महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये  बुडीत बंधारा आकल्पेआहिरेफुरुसहरचंदीकळम गावलामजकोट्रोशीम्हावशी,  मुनावळेनिवळी क्र. १निवळी क्र. २पाली तर्फ आटेगाव,  पिंपरी तर्फ तांबरेनोशीउचाटवाळणेआवळण,  दरे तर्फ तांब क्र १दरे तर्फ तांब क्र. २आणि जावळी तालुक्यातील  आमशीगावढोशीकेळघर तर्फ सोळशी,  तेटलीशेंबडी आणि  वेंगळे या बुडीत बंधाऱ्याच्या समावेश आहे.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi