Tuesday, 18 February 2025

झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 . झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि.१८: अल्पसंख्याक विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमध्ये पात्र मदरशांना पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करून जास्तीत जास्त रु. १०.०० लाख इतक्या मर्यादपर्यंत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

"डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना" सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांना दि. २२ फेब्रुवारी२०२५ पर्यंत प्रस्ताव मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे. अल्पसंख्याक विकास विभागातील तरतुदीनुसार अटी व शर्तीची पुर्तता करणा-या मदरसांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. ज्या मदरसांना Scheme for Providing Quality Education in Madrasa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi