Tuesday, 18 February 2025

मुंबई उपनगर जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शाळांनी अनुदान मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 मुंबई उपनगर जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शाळांनी

अनुदान मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि.१८ : सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मुंबई उपनगर जिल्हयातील अल्पसंख्याक बहुल शाळांनी दि. २२ फेब्रुवारी२०२५ पर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगर जिल्हयातील "धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनु‌दानित,विनाअनुदानितकायमविना अनुदानित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना" राबविण्यात येत आहे.

धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या रु.२.०० लाख अनुदानात वाढ करून अनुदान रु.१०.०० लाखापर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मुंबई उपनगर जिल्हयातील अल्पसंख्याक बहुल शाळांनी दिनांक २२ फेब्रुवारी२०२५ पर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत.

अटी व शर्तीची पूर्तता करणा-या शाळांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.संबंधित शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ७०% व अपंग शाळामध्ये ५०% विद्यार्थी हे अल्पसंख्यांक समुदायातील असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी संबंधित शाळाकनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना शासनाकडून मान्यत मिळालेली असणे आवश्यक आहे. स्वंय-अर्थसहाय्यित शाळा योजनेसाठी पात्र असणार नाहीत असे मुंबई उपनगर जिल्हा जिल्हाधिकारी  कार्यालय यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi