Monday, 10 February 2025

छत्रपती संभाजी नगर मधील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

 छत्रपती संभाजी नगर मधील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. 10 : जल जीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण ११६४ योजनांची  कामे जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला.  नळ पाणी पुरवठा अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी पूर्ण झालेल्या ७१७  योजना असूनउर्वरित ४४० कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही  करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत योजनांची आर्थिक आणि भौतिक प्रगती, सिल्लोडगंगापूर-वैजापूर ग्रीडदेवगावपिशोरलाडसावंगीकेळगावचारनेरशिरसाळा३५ गावे औरंगाबादरेल कनकावतीनगर पाणी पुरवठा योजनांची सद्य:स्थितीकामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या समस्या१०० दिवस कार्यक्रम अंतर्गत पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांचा मंत्री श्री. पाटील यांनी आज मंत्रालयातील दालनात आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नळ जोडणी अंतर्गत ७१८ गावांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नळ जोडणीच्या १४ च्या राबविण्यात येत आहे. यामध्ये १४ लाख २२ हजार ६५१ लोकसंख्येत २ लाख ८५ हजार ९८ घरे आहेत. २ लाख २६ हजार ६५४ नळ जोडणी पूर्ण केली असूनदोन लाख ३७ हजार ११५ नळ जोडणी १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत साध्य करण्यात येणार आहे.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेविशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरेछत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.) जल  जिवन मिशनचे अभियान संचालक इ. रविंद्रनमुख्य अभियंता मनिषा पलांडेकार्यकारी अभियंता दी. ह. कोळीअजित वाघमारेवरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi