Friday, 17 January 2025

कागल तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे होणार

 कागल तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय

सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे होणार

 

कोल्हापूर जिल्ह्यामधील  कागल तालुक्यातील नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयास मौजे सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथील जमीन निःशुल्क उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित ५० रूग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास ४ ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. तथापि राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगनवी दिल्ली यांच्या मानकांनुसार मौजे सांगाव येथे या होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी पुरेशीसलग व सुयोग्य जागा उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता पिंपळगाव खुर्द ( ता. कागल) येथील गट क्र.४८७ मधील गायरान जमीनीपैकी ५.७५ एकर  जमीन उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ही जमीन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi