लोक माझ्याबद्दल काय विचार करतात?लोक माझ्याबद्दल काय बोलतात? लोक माझ चुकीच valuation करतात. एक ना अनेक प्रकारे आपण लोकांचा विचार करत असतो. आपण इतका लोकांचा विचार करतो की आपण स्वतः पण ह्या जगात आहोत ह्याचा आपल्याला विसर पडतो.
मी चांगला म्हणून पूर्ण जगसुद्धा चांगल असलच पाहीजे असा विचार करणं म्हणजे ओढ्याप्रमाणे ऊन्हाळ्यात समुद्रही सुकायलाच हवा अशी अपेक्षा करणं.
एक तर आपल स्वतःचं व्हॕल्युएशन आपल्याखेरीज दुसरं कोणीच करू शकत नाही,कारण प्रत्येक व्यक्ती तिच्या तिच्या विचारसरणीप्रमाणे, त्या दृष्टीने तुमच्याकडे बघणार, जे कधीच पूर्णतः खर नसणार. त्यामुळे कोण आपल काय व्हॕल्युएशन करतय ह्यापेक्षा मी स्वतःला किती ओळखते हे महत्त्वाचं आहे.
आता मुद्दा राहीला लोक काय विचार करतील ,काय बोलतील आपल्याबद्दल हा तर तिथेही हाच नियम आहे,जशी त्यांची विचारसरणी तशी त्यांची कृती. एक लक्षात ठेवायचं तुमच्या बद्दल बोलावस वाटतय तुमच्या बद्दल विचार करावासा वाटतोय त्यांना म्हणजे तुम्हि महत्त्वाचे आहात त्यांच्यासाठी. कारण महत्त्व नसलेल्या गोष्टींवर विचार केला जात नाहि किंवा त्यावर बोललपण जात नाहि. त्यामुळे ऊगीच स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यापेक्षा, आपण महत्त्वाचे आहोत हा विचार करायचा आणि अधिकाधिक स्वतःवर फोकस करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं. बस इतकच......
No comments:
Post a Comment