Wednesday, 30 October 2024

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत

१८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. ३० :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.

यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सी-व्हिजील ॲपवर तक्रार  करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi